सोमवार, १७ मे, २०१०

कळत नकळत काही आठवणी ...


कळत नकळत काही आठवणी मनात घर करुन जातात. कधी एकांतक्षणी सुखाचा आस्वाद देवुन जतात. व. पु. म्हणतात, पण अशा आठवणी सुखापेक्षा त्रासच अधिक देतात, कारण त्या भूतकाळात दडून गेलेल्या असतात आणि वर्तमानकाळाला सतावत असतात. मग आपल्याला एकांतपणाची तीव्र जाणिव होऊ लागते. हा त्रासच नव्हे का ?
माझ्या आयुष्यात असे एकांतपणाचे अनेक क्षण आले आहेत.कधी कधी तो त्रासदायक असतो तर कधी आत्मपरीक्षण करायला लावतो. यामध्ये पहिला प्रकार फार भयानक.नको ते विचार मन करायला लागते. यात दुसरा प्रकार म्हणजे आत्मपरिक्षण. यात नवीन म्हणजे माझ्या मतानुसार तुमचे छंद, तुमच्या आवडी-निवडी या गोष्टींची तुम्हाला अधिक जाणीव होते आणि तुम्हाला त्या जपण्याची एक ओढही लागते. मला वाटते हा एकांतपणाचा क्षण कधी सरूच नये. तो तुमच्या अंतरंगातले दार सताड उघडे करून नवीन-नवीन गोष्टी आत्मसात करायला उद्युक्त करतो.
एकांतपणा जरा जास्तच त्रासदायक वातटायला लागला की मग काय मित्रांना celebration करायला एकत्र बोलवायचे. Just chill out and forget about loneliness, now you are surrounded with your friends...!!! आणि परत एक आठवण-स्म्रुती तयार भविष्यात सुख/त्रास देण्यासाठी.